सतत निगेटिव्ह वाटतंय? पॉझिटिव्ह राहण्यासाठी वाचा प्रभावी उपाय
किशोरी घायवट-उबाळे
दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा : उठल्यावर तणावपूर्ण विचारांऐवजी "आजचा दिवस चांगला जाईल" असा विचार करा. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
कृतज्ञतेची सवय लावा : दररोज मिळालेल्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानल्यास मन आपोआप सकारात्मक होतं.
नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवा :सतत तक्रार करणाऱ्या लोकांचा सहवास टाळल्यास विचारांवर चांगला परिणाम होतो.
ध्यान आणि प्राणायाम करा : दररोज काही मिनिटं ध्यान केल्याने मन शांत राहतं आणि सकारात्मकता वाढते.
स्वतःशी चांगलं बोला : मी करू शकतो, मी सक्षम आहे असे स्वतःला वारंवार सांगा.
आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढा : वाचन, गायन, लेखन यांसारख्या छंदांमुळे मन हलकं होतं.
सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घ्या : सतत तुलना करणाऱ्या पोस्ट्सपासून दूर राहिल्यास मनावरचा ताण कमी होतो.
(Disclaimer: यामध्ये दिलेले सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)