सणवारांना नटताना स्किनटोननुसार कपड्यांची निवड कशी कराल? जाणून घ्या
Mayuri Gawade
तुमच्या स्किनटोननुसार कपड्यांचा रंग निवडल्यास सणवारांच्या लूकला आणखी उठाव मिळू शकतो. आधी मनगटावरील नसा पाहून तुमचा अंडरटोन ओळखा.
मनगटावरील नसा हिरव्या दिसत असतील, तर तुमचा अंडरटोन वॉर्म असू शकतो. अशा टोनवर ऑलिव्ह, मरून, गोल्डन आणि पीचसारखे रंग खुलून दिसतात.
वॉर्म अंडरटोनसाठी मोहरी, ऑरेंज आणि हिरव्या रंगांच्या शेड्सही चांगला पर्याय ठरू शकतात. त्यामुळे सणवारांसाठी या रंगांचे कपडे नक्की ट्राय करा.
मनगटावरील नसा निळ्या किंवा जांभळ्या दिसत असतील, तर तुमचा अंडरटोन कूल असू शकतो. अशा टोनवर निळा, गुलाबी, जांभळा, सिल्व्हर आणि राखाडी रंग खुलून दिसतात.
कूल अंडरटोन असणाऱ्यांनी रॉयल ब्ल्यू, राणी पिंक, पर्पल आणि लॅव्हेंडरसारख्या शेड्सचा विचार करावा. हे रंग फेस्टिव्ह लूकला अधिक फ्रेश लूक देऊ शकतात.
मनगटावरील नसा हिरव्या आणि निळ्या दोन्ही छटांच्या दिसत असतील, तर तुमचा अंडरटोन न्यूट्रल असू शकतो. अशा टोनवर अनेक रंग सहज खुलून दिसतात.
न्यूट्रल अंडरटोन असल्यास पिंक, ब्ल्यू, ग्रीन, मरून, मस्टर्ड अशा विविध रंगांचा प्रयोग करता येतो. त्यामुळे कपडे निवडताना पर्यायही अधिक मिळतात.
साडी असो, ड्रेस असो किंवा एथनिक वेअर; स्किनटोनला अनुरूप रंग निवडण्याचा हा फॉर्म्युला कोणत्याही कपड्यांसाठी वापरता येतो.
स्किनटोननुसार रंग निवडणे हा फक्त फॅशनचा मार्गदर्शक आहे. एखादा रंग तुम्हाला आवडत असेल आणि आत्मविश्वास देत असेल, तर तोच रंग तुमच्यासाठी परफेक्ट आहे. | All Photos : AI Generated