तेलकट, कोरडी की सेन्सिटिव्ह? त्वचेच्या प्रकारानुसार 'असा' निवडा फेसवॉश

किशोरी घायवट-उबाळे

प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असल्याने एकच फेसवॉश सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.
ऑयली स्किन असल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण स्वच्छ करणारा फेसवॉश निवडा.
ड्राय स्किनसाठी त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवणारा सौम्य फेसवॉश योग्य ठरू शकतो.
कॉम्बिनेशन स्किनसाठी चेहऱ्यावरील तेलकट आणि कोरड्या भागांचा समतोल राखणारे उत्पादन निवडा.
सेन्सिटिव्ह स्किन असल्यास तीव्र सुगंध आणि त्वचेला त्रास देणारे घटक असलेली उत्पादने टाळा.
फेसवॉश खरेदी करण्यापूर्वी त्यावरील घटक आणि आपल्या त्वचेच्या गरजा तपासा.
नवीन फेसवॉश वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे फायदेशीर ठरू शकते.
त्वचेची समस्या वारंवार होत असल्यास स्वतःहून प्रयोग करण्याऐवजी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)