WhatsApp वर असा DP ठेवलात तर मित्रही विचारतील कसा बनवला फोटो? AI ची ही ट्रिक जाणून घ्या
Mayuri Gawade
व्हॉट्सॲपवर जुनेच प्रोफाइल फोटो ठेवून कंटाळा आला असेल, तर आता AI च्या मदतीने तुम्ही स्वतःचे वेगवेगळ्या स्टाईलमधील आकर्षक फोटो तयार करू शकता.
मेटा कंपनीने व्हॉट्सॲप युजर्ससाठी 'Imagine Me' हे खास AI फीचर उपलब्ध करून दिले आहे. या फीचरच्या मदतीने काही सेकंदांत स्वतःचा नवा अवतार तयार करता येतो.
यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सॲपमधील Meta AI चॅटबॉट उघडून त्याला 'Imagine me...' असा मेसेज पाठवावा लागतो.
पहिल्यांदा हे फीचर वापरताना AI तुम्हाला चेहऱ्याचे समोरून, डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने असे तीन स्पष्ट सेल्फी अपलोड करण्यास सांगते.
हे फोटो अपलोड केल्यानंतर तुम्ही इंग्रजी भाषेत प्रॉम्प्ट देऊन स्वतःचा वेगवेगळ्या स्टाईलमधील लूक तयार करू शकता. सध्या हे फीचर इंग्रजी प्रॉम्प्टवर काम करते.
तुम्हाला थ्रीडी कार्टून अवतार हवा असेल तर 'Imagine me as a 3D cartoon avatar' असा प्रॉम्प्ट द्या. सायबरपंक लूकसाठी 'Imagine me in a cyberpunk style' असे लिहू शकता.
केवळ नवीन फोटोच नाही, तर तुमचे जुने फोटोही AI च्या मदतीने एडिट करता येतात. यासाठी जुना फोटो अपलोड करून 'Make it a 3D cartoon' किंवा बॅकग्राउंड बदलण्याचा प्रॉम्प्ट द्यावा.
AI च्या मदतीने तयार केलेल्या फोटोवर 'Imagined with AI' असा वॉटरमार्क दिसतो. तसेच, सेटअपसाठी अपलोड केलेले फोटो मेटा AI च्या सेटिंग्जमधून डिलीट करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
मात्र, AI च्या मदतीने फोटो तयार करताना प्रायव्हसीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनोळखी किंवा थर्ड पार्टी AI ॲपवर स्वतःचे खासगी फोटो अपलोड करण्याऐवजी अधिकृत आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्मचा वापर करा. | All Photos : AI Generated