डार्क सर्कल्स पासून सुटका मिळवायची आहे? ‘हे’ घरगुती उपाय वापरून पहा

Swapnil S

माणूस कितीही सुंदर असला तरी डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळे सगळं बिघडवू शकतात. बरेचदा तर ज्याला हे डार्क सर्कल्स असतात तोच माणूस हे घालवण्याचा इतका प्रयत्न करत असतो की बास्स! तरीही कितीही उपाय केले तरी डार्क सर्कल्स काय कमी होत नाही. हे काही उपाय आहेत जे एकदा नजरेखालून घाला, काय माहित कोणता उपाय खरंच जादू करेल?
बदाम तेल आणि दूध :- थंड दुधात थोडे बदामाचे तेल घालावे. या तयार मिश्रणात कापसाचे दोन बोळे बुडवून ठेवा. कापसाचे बोळे डोळ्यांवर अशा प्रकारे ठेवा की ते काळी वर्तुळे झाकून घेतील | PM
15-20 मिनिटे ठेवा हे बोळे यानंतर ताज्या पाण्याने धुवून घ्या. हा उपाय दररोज करा.
थंड दूध :- सर्वप्रथम एका बाऊलमध्ये थोडे थंड दूध घ्या. त्यानंतर त्यात कापसाचे दोन बोळे भिजत ठेवावे. कापसाचे बोळे डोळ्यांच्यावर अशा प्रकारे ठेवा की यामुळे काळी वर्तुळे झाकली जातील. बोळे 20 मिनिटे ठेवा. | PM
आता कापसाचे बोळे काढून टाका. त्यानंतर चेहरा ताज्या पाण्याने धुवून घ्यावा. आपण दररोज तीन वेळा हे करू शकता.
गुलाबजल आणि दूध:- थंड दूध आणि गुलाबजल समप्रमाणात मिसळा. मिश्रणात दोन कॉटन पॅड भिजत ठेवा. | PM
त्यांना आपल्या डोळ्यांच्या वर ठेवा. डार्क सर्कल लावून झाकून ठेवा. 20 मिनिटे ठेवा. कॉटन पॅड काढून ताज्या पाण्याने डोळे धुवा. डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी आठवड्यातून 3 वेळा दुधासोबत ही प्रक्रिया करावी.