केळी आवडते? पण, केमिकलने पिकवली आहे की नाही हे कसे ओळखायचे?

Krantee V. Kale

केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि त्यात भरपूर पोषक तत्वे असतात. | All Photos- Yandex
दररोज केळी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
त्वचा चमकदार बनवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यापर्यंत, केळी खाल्ल्याने अनेक फायदे होतात.
परंतु, आजकाल केमिकलने पिकवलेली केळी देखील बाजारात उपलब्ध आहेत.
नैसर्गिकरित्या पिकवलेली आणि केमिकलने पिकवलेल्या केळ्यांमधला फरक कसा ओळखायचा, जाणून घ्या.
केळी पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड सारख्या हानिकारक केमिकलचा वापर केला जातो.
केळी पाण्यात टाका. जर ते बुडाले तर ते नैसर्गिकरित्या पिकलेले आहे. पण जर ते पाण्यावर तरंगले तर ते केमिकल पद्धतीने पिकवलेले आहे.
नैसर्गिकरित्या पिकवलेल्या केळ्यांना सौम्य, गोड आणि ताजा सुगंध असतो, तर केमिकल पद्धतीने पिकवलेल्या केळ्यांना केमिकलचा वास येतो.
जर केळी अधिक चमकदार आणि पिवळी दिसत असेल तर ती केमिकल पद्धतीने पिकवली आहे. नैसर्गिकरित्या पिकलेली केळी हलकी पिवळी आणि कमी चमकदार दिसतात.