कोथिंबीर फ्रीजमध्येही सडतेय? ताजी ठेवण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स
Mayuri Gawade
फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही कोथिंबीर लवकर सडत असेल किंवा तिची पाने पिवळी पडत असतील, तर साठवण्याची योग्य पद्धत वापरणे गरजेचे आहे.
कोथिंबिरीमध्ये जास्त ओलावा राहिल्यास तिची पाने लवकर काळी किंवा पिवळी पडतात आणि जुडी सडू लागते.
कोथिंबीरीची मुळे आणि देठाचा खालचा भाग थोडा कापून ती काचेच्या बरणीत थोड्या पाण्यात उभी ठेवता येते.
कोथिंबीर पाण्यात ठेवताना तिची पाने पाण्यात बुडणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि दर २ ते ३ दिवसांनी पाणी बदलावे.
कोथिंबीर धुवून फ्रीजमध्ये ठेवायची असल्यास ती पूर्णपणे वाळल्यानंतरच साठवावी.
कोरड्या पेपर टॉवलमध्ये कोथिंबीर गुंडाळून डब्यात किंवा झिप-लॉक बॅगमध्ये ठेवल्यास अतिरिक्त ओलावा शोषला जातो.
डब्यात टिश्यू पेपर आणि कोथिंबीरीचे वेगवेगळे थर लावून ठेवल्यास ती दाबली जात नाही आणि ८ ते १० दिवस ताजी राहू शकते.
सफरचंद आणि केळीमधून बाहेर पडणाऱ्या इथिलीन वायूमुळे कोथिंबीर लवकर पिवळी पडू शकते, त्यामुळे ती या फळांपासून दूर ठेवावी.
कोथिंबीर नियमित वापरत असाल, तर हर्ब कीपर बॉक्समध्ये ठेवल्याने ती १० ते १५ दिवस ताजी आणि हिरवीगार राहू शकते. | All Photos : AI Generated