केमिकल-फ्री काजळ हवंय? फक्त ५ वस्तूंमध्ये तयार करा घरगुती काजळ
Mayuri Gawade
बाजारातील रासायनिक काजळाऐवजी घरगुती हर्बल काजळ हा डोळ्यांसाठी नैसर्गिक पर्याय ठरू शकतो.
कडुलिंबाची पाने, कापूर, तूप आणि कापूस यांसारख्या साध्या वस्तूंनी हे काजळ तयार करता येते.
यासाठी कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून उन्हात चांगली वाळवून घ्या.
वाळलेल्या पानांना कापसात गुंडाळून त्याची वात तयार करा.
दिव्यामध्ये तूप, कापूर आणि तयार केलेली वात ठेवून दिवा पेटवा.
दिव्यावर प्लेट झाकून ठेवल्यानंतर त्यावर जमा होणाऱ्या काळ्या थरापासून काजळ तयार होईल.
प्लेट थंड झाल्यानंतर चमच्याच्या मदतीने जमा झालेले काजळ अलगद एका डब्यात काढा.
हवाबंद डब्यात साठवलेले हे हर्बल काजळ रोजच्या वापरासाठी सुरक्षित आणि सोयीचे ठरू शकते.
नैसर्गिक घटकांपासून तयार झालेले कडुलिंबाचे काजळ डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यास मदत करू शकते. | All Photo : Ai Generated