कांदा चिरण्याची कटकट संपली! एकदाच बनवा कांदा पावडर आणि महिनाभर वापरा
Mayuri Gawade
रोजच्या स्वयंपाकात कांद्याचा वापर होत असला तरी तो चिरण्याची कटकट अनेकांना नकोशी वाटते.
घरच्या घरी तयार केलेली कांदा पावडर पदार्थांना झटपट स्वाद आणि सुगंध देण्याचा सोपा पर्याय ठरू शकते.
बाजारातील महागडी कांदा पावडर विकत घेण्याऐवजी ती घरीच सहज तयार करता येते.
कांदा पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम कांद्याची टरफलं काढून त्याच्या पातळ गोल चकत्या करून घ्या.
या चकत्या कडक उन्हात दोन ते तीन दिवस वाळवल्यास त्यातील ओलावा पूर्णपणे कमी होण्यास मदत होते.
कांदा पूर्णपणे कुरकुरीत झाल्यानंतर तो मिक्सरमध्ये बारीक वाटून पावडर तयार करा.
जर कांद्यात ओलसरपणा राहिला असेल, तर कढईत हलके भाजून तो अधिक कोरडा करून घेऊ शकता.
तयार कांदा पावडर एअरटाईट डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवल्यास ती जास्त काळ टिकू शकते.
भाजी, सूप, सलाड, पराठा किंवा कोशिंबिरीमध्ये कांदा पावडर वापरल्यास पदार्थांना खमंग चव आणि सुवास मिळतो. | All Photos : Ai Generated