बीटरूटपासून लिप बाम कसा बनवायचा? गुलाबी ओठांसाठी आहे उत्तम नैसर्गिक पर्याय

Kkhushi Niramish

ओठांना नैसर्गिकरित्या गुलाबी बनवण्यासाठी घरच्या घरी बनवा बीटरूटपासून लिप बाम. प्रथम बीटरूट किसून घ्या. | All Photo - Cecil Vig You Tube
किसलेल्या बीटरूटचा रस काढून घ्या.
या बीटरूट रसमध्ये एक चमचा खोबऱ्याचे घट्ट झालेले तेल घाला.
हे मिश्रण डबल बॉइलरमध्ये उकळा.
हे मिश्रण निम्मे उकळल्यानंतर यामध्ये बी वॅक्स घालून हे मिश्रण पुन्हा उकळून घ्या.
नंतर हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
हे मिश्रण अशा प्रकारे क्रिमी सॉफ्ट होईल.
आता हे मिश्रण एका छोट्या डबीत भरून ठेवा.
बीटरूट लीपबाम तयार आहे. दररोज रात्री लावल्यास निश्चितच ओठांचा काळपटपणा कमी होईल.