दिवाळीच्या रांगोळीतील फुलं फेकू नका; घरच्या घरी तयार करा सेंद्रिय खत; पाहा सोप्या स्टेप्स

Mayuri Gawade

दिवाळीत फुलांच्या सुंदर रांगोळ्या काढल्या असतील, तर त्यातील वापरलेली फुलं फेकून देऊ नका. त्यापासून घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करता येतं.
लक्ष्मीपूजनासाठी आणलेले फुलांचे हार, गजरे आणि पूजेत वापरलेली फुलं गोळा करा. त्यातील प्लास्टिक, दोरे आणि इतर कचरा वेगळा करा.
गोळा केलेल्या फुलांच्या पाकळ्या आणि पानांचे छोटे तुकडे करा. यामुळे फुलं लवकर कुजण्यास मदत होते.
आता एक जुनी बादली किंवा कुंडी घ्या. त्याच्या तळाशी मातीचा हलका थर पसरवा.
मातीवर फुलांचा थर द्या. त्यानंतर त्यावर थोडं शेणखत किंवा जुनं कंपोस्ट आणि माती टाका.
अशाच प्रकारे माती, फुलं आणि कंपोस्टचे थर एकावर एक लावत राहा. मिश्रण जास्त कोरडं किंवा पाण्याने भरलेलं नसावं.
बादली किंवा कुंडीला झाकण ठेवा. ती थेट सूर्यप्रकाशात न ठेवता सावलीच्या ठिकाणी ठेवा.
साधारण ३० ते ४५ दिवस हे मिश्रण कुजण्यासाठी ठेवा. अधूनमधून ते हलवा आणि आवश्यकतेनुसार थोडं पाणी शिंपडा.
फुलं पूर्णपणे कुजल्यानंतर तयार झालेलं सेंद्रिय खत कुंड्यांमधील मातीत मिसळा. अशा प्रकारे सणानंतर उरलेल्या फुलांचा उपयोग झाडांच्या वाढीसाठी करता येईल. | All Photos : AI Generated