केसांना फाटे फुटलेत? 'या' टिप्सने होतील केस मजबूत

किशोरी घायवट-उबाळे

नियमित ट्रिमिंग करा : दर ६ ते ८ आठवड्यांनी केसांची टोकं कापल्यास फाटे वाढत नाहीत. | (सर्व छायाचित्रे : Yandex)
केसांना तेलमालिश द्या : नारळ किंवा बदाम तेलाने आठवड्यातून २ वेळा मसाज केल्याने केस मजबूत होतात.
हिट टूल्सचा वापर कमी करा : स्ट्रेटनर, कर्लर, ब्लो ड्रायरचा अति वापर टाळा. त्याने फाटे फुटण्याची समस्या वाढते.
माइल्ड शॅम्पू वापरा : सल्फेट-फ्री शॅम्पू केसांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते.
कंडिशनर आणि हेअर मास्क वापरा : प्रत्येक वॉशनंतर कंडिशनर आणि आठवड्यातून एकदा डीप कंडिशनिंग करणे आवश्यक आहे.
ओले केस रगडू नका : टॉवेलने केस जोरात पुसण्याऐवजी हलक्या हाताने पुसा.
संतुलित आहार घ्या : प्रथिने, आयर्न, बायोटिनयुक्त आहार केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)