पावसाळ्यात कपड्यांमधील कुबट वास होईल छूमंतर! धुण्याच्या पाण्यात टाका हा पांढराशुभ्र खडा
Mayuri Gawade
पावसाळ्यात सततच्या पावसामुळे आणि दमट वातावरणामुळे कपडे लवकर सुकत नाहीत. त्यामुळे त्यांना कुबट वास येण्याची समस्या वाढते.
कपडे स्वच्छ धुतले तरी पूर्णपणे न वाळल्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात आणि दुर्गंधी निर्माण होऊ शकते.
या समस्येवर घरगुती उपाय म्हणून तुरटीचा (पांढराशुभ्र खडा) वापर फायदेशीर ठरू शकतो.
कपडे धुतल्यानंतर शेवटच्या स्वच्छ पाण्यात तुरटीचा छोटा खडा किंवा थोडी तुरटीची पूड मिसळा.
या पाण्यात कपडे १० ते १५ मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर नेहमीप्रमाणे वाळत घाला.
तुरटीमुळे कपड्यांमधील ओलाव्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी कमी होण्यास मदत होते आणि कपडे अधिक फ्रेश राहतात.
टॉवेल, जिमचे कपडे, मोजे आणि रोज वापरातील कपड्यांसाठी हा उपाय विशेष उपयुक्त ठरू शकतो.
कपडे धुतल्यानंतर ते वॉशिंग मशीनमध्ये जास्त वेळ ठेवू नका. शक्य तितक्या लवकर हवेशीर ठिकाणी वाळत घाला.
कपड्यांना अधिक ताजातवाना सुगंध हवा असेल, तर धुण्याच्या पाण्यात लव्हेंडर किंवा लिंबाच्या एसेन्शियल ऑईलचे काही थेंबही घालू शकता. | All Photos : Ai Generated