Kitchen Hacks : स्वयंपाकाचा गॅस कसा वाचवता येईल? इथे आहेत काही सोप्या ट्रिक्स

Mayuri Gawade

आजकाल स्वयंपाकासाठी गॅसचा वापर जास्त होतो. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
जर आपण काही सोप्या पद्धतींचा अवलंब केला, तर गॅसची बचत करता येईल आणि खर्चही कमी होईल.
स्वयंपाकाची पूर्वतयारी: भाज्या कापणे, मसाले तयार ठेवणे आणि इतर तयारी आधी करून ठेवल्यास स्वयंपाक करताना गॅस कमी लागतो आणि वेळही वाचतो.
भांडे कोरडे ठेवा: ओले भांडे गरम होण्यासाठी जास्त वेळ घेतात. स्वयंपाक करताना नेहमी कोरडे भांडे वापरा.
कुकरचा वापर करा: भात, डाळ किंवा इतर पदार्थ कुकरमध्ये शिजवल्यास गॅसची बचत होते.
अन्न झाकून शिजवा: झाकण लावल्यास उष्णता बाहेर जात नाही, त्यामुळे गॅस वाचतो आणि अन्नही चांगले शिजते.
थंड पदार्थ लगेच गरम करू नका: फ्रिजमधील पदार्थ २-३ तास बाहेर काढून नंतर गॅसवर ठेवा. थेट गरम केल्यास जास्त गॅस लागतो.
गॅस वापर झाल्यानंतर बंद करा: स्वयंपाक करून झाल्यानंतर गॅस सिलेंडरचा मेन स्विच बंद करा. यामुळे गॅस वाचतो आणि सुरक्षिततेसाठीही योग्य आहे.