पपई गोड आहे की नाही कशी ओळखाल? खरेदी करताना लक्षात ठेवा ही सोपी ट्रिक

Mayuri Gawade

तब्येत चांगली ठेवायची असेल तर आहारात फळं खूप महत्त्वाची असतात आणि त्यात पपईला विशेष स्थान आहे.
पपईमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, फायबर आणि पोषक घटक असल्यामुळे ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.
पपई खाल्ल्याने पचन सुधारते आणि पोट साफ राहण्यास मदत होते.
मात्र बाजारात चांगली आणि गोड पपई कशी ओळखायची हे अनेकांना समजत नाही.
बाजारात साधारणपणे दोन प्रकारच्या पपया मिळतात – लांबट आणि गोल.
साधारणपणे गोल पपई जास्त गोड आणि रसाळ असते, तसेच त्यामध्ये बिया कमी असतात.
लांबट पपईला ‘पूसा जायंट’ ही जात म्हणतात आणि त्यामध्ये बिया जास्त असतात.
पपई खरेदी करताना तिच्या सालीवर हिरवट आणि नारिंगी रंगाच्या छटा दिसत असतील तर ती नैसर्गिकरीत्या पिकलेली असते.
पपईची साल गुळगुळीत दिसावी आणि हलक्या हाताने दाबल्यावर ती थोडी मऊ वाटली तर ती गोड आणि रसाळ असण्याची शक्यता जास्त असते.
पपईमध्ये फायबर, पपेन एन्झाइम, व्हिटामिन A आणि C असल्यामुळे वजन कमी करणे, पचन सुधारणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. | All Images : Pintrest