हृतिक रोशन-सबा आझादच्या नात्याला ५ वर्षे पूर्ण; 'HAPPY 5th My Love' म्हणत शेअर केले रोमँटिक फोटो

Mayuri Gawade

हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या नात्याला पाच वर्षे पूर्ण झाली असून, या खास क्षणाचा आनंद दोघांनीही सुंदर आठवणींनी साजरा केला.
हृतिकने सबासोबतचे अनेक रोमँटिक आणि candid फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या नात्यातील खास क्षण पुन्हा चाहत्यांसमोर आणले.
कधी निवांत ट्रिपवर, कधी डिनर डेटवर तर कधी एकमेकांसोबत शांत वेळ घालवताना ही जोडी फोटोंमध्ये खूपच आनंदी दिसत आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर टिपलेला हृतिक आणि सबाचा रोमँटिक फोटो चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
हृतिकने या खास पोस्टला ‘It’s our birthday, HAPPY 5th my love’ अशी प्रेमळ कॅप्शन देत सबावरील भावना व्यक्त केल्या.
दोघांच्या प्रवासातील, फिरण्यातील आणि एकत्र घालवलेल्या आनंदी क्षणांची झलक या फोटो पोस्टमधून पाहायला मिळत आहे.
हृतिक आणि सबाच्या या खास फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त करत त्यांच्या नात्याच्या पाचव्या वर्षासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
पाच वर्षांच्या या सुंदर प्रवासानंतरही हृतिक आणि सबाची chemistry तितकीच खास दिसत असून, त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. | All Photos : Hrithik Roshan| Instagram