फुलांच्या ड्रेसमध्ये खुललं हृता दुर्गुळेचं सौंदर्य; पाहा तिचा सोज्वळ अंदाज

Mayuri Gawade

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे आपल्या अभिनयाबरोबरच सुंदर आणि हटके फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या प्रत्येक लूकला चाहत्यांची भरभरून पसंती मिळते.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी हृता आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच खास फोटो शेअर करत असते. पारंपरिक असो किंवा मॉडर्न, तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो.
नुकतेच हृताने फुलांची सुंदर नक्षी असलेल्या हिरवट रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या साध्या आणि आकर्षक लूकमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.
फुलांच्या नक्षीच्या ड्रेससोबत हृताने त्याच डिझाइनची ओढणी घेतली आहे. मोकळे केस, कपाळावर छोटीशी टिकली आणि कानातील आकर्षक झुमक्यांमुळे तिच्या लूकला खास उठाव मिळाला आहे.
या फोटोंना हृताने ‘Mentally still stuck in the festive glow, Missing the Diwali week’ अशी कॅप्शन दिली आहे. म्हणजेच दिवाळी संपली असली, तरी हृताचं मन अजूनही सणाच्या आनंदी आठवणींमध्ये रमलेलं आहे.
दिवाळीच्या दिवसांतही हृताने आपले खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये तिचा सुंदर अंदाज पाहायला मिळाला होता.
दिवाळीनिमित्त हृताने पती प्रतीक शाहसोबतचे काही गोड फोटोही शेअर केले होते. फुलांनी सजवलेल्या सुंदर ठिकाणी दोघांनी एकत्र फोटो काढले असून त्यांच्या जोडीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
हृता आणि प्रतीकचे दिवाळीतील काही मिरर सेल्फीही खास ठरले. दोघांचा साधा, स्टायलिश आणि आनंदी अंदाज या फोटोंमधून पाहायला मिळतो. त्यांच्या या गोड जोडीवर चाहते नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत असतात.
All Photos : Instagram | Hruta Durgule, Pratik Shah