तुम्ही खाताय आईस्क्रिम की फ्रोजन डेझर्ट? पॅकेटवरील 'ही' माहिती नक्की वाचा
Mayuri Gawade
आईस्क्रिम खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही, पण तुम्ही खात आहात ते खरंच आईस्क्रिम आहे का हे तपासणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
बाजारात आईस्क्रिमसारखे दिसणारे अनेक पदार्थ प्रत्यक्षात ‘फ्रोजन डेझर्ट’ असतात.
चव आणि टेक्स्चर सारखे वाटले तरी आईस्क्रिम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये मोठा फरक असतो.
आईस्क्रिम हे दूध, साय किंवा डेअरी फॅटपासून तयार केले जाते, तर फ्रोजन डेझर्टमध्ये वनस्पतीजन्य तेलांचा वापर केला जातो.
पाम ऑईल आणि कोकोनट ऑईलसारखे घटक फ्रोजन डेझर्टमध्ये मोठ्या प्रमाणात आढळू शकतात.
डेअरी फॅटचा वापर होत असल्याने आईस्क्रिमची किंमत तुलनेने जास्त असते.
फ्रोजन डेझर्टमध्ये बर्फाचे कण अधिक जाणवू शकतात, तर आईस्क्रिम अधिक घट्ट आणि क्रीमी असते.
उत्पादनाच्या पाकिटावरील माहिती वाचून आईस्क्रिम आणि फ्रोजन डेझर्टमधील फरक सहज ओळखता येतो.
‘Milk Fat’, ‘Butterfat’ किंवा ‘Dairy’ असे शब्द दिसल्यास ते उत्पादन आईस्क्रिम असल्याची शक्यता असते.
तज्ज्ञांच्या मते, ट्रान्सफॅटचे प्रमाण जास्त असलेल्या फ्रोजन डेझर्टपेक्षा मर्यादित प्रमाणात आईस्क्रिम खाणे तुलनेने अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. | All Images : Ai Generated