प्रोटीन पावडर घेत असल्यास, जाणून घ्या साइड इफेक्ट्स

Swapnil S

वर्कआउट नंतर प्रोटीन पावडर घेतल्यानं इन्सुलिन वाढतं, अशा प्रकारे नियमितरुपे इंसुलिन मध्ये होणारी ही वाढ पुढे जाऊन आरोग्यास नुकसानदायी असते.
प्रोटीन सहसा जिममध्ये वर्कआउट करणारे आणि बॉडी बिल्डर घेतात. हे स्नायू(मसल्स) तयार करण्यात उपयुक्त असतं पण ह्याला ज्या प्रकारे तयार करतात, ते शरीरासाठी नुकसानदायी असतं.
प्रोटीन सारख्या पावडरमध्ये विविध प्रकाराचे हार्मोन्स आणि बायोएक्टिव पेपटिड्स असतात. ज्यांना घेतल्यानं सीबम उत्पादने वाढतात. बऱ्याच अभ्यासामध्ये आढळून आले आहे की प्रोटीनयुक्त आहार घेतल्यानं मुरुमांची समस्यां वाढू शकते.
प्रोटीन पावडर घेतल्यानं शरीरात न्यूट्रिशन(पौष्टीक)चे असंतुलन होतात. नैसर्गिक प्रथिनं जसे अंडी, दूध आणि मीट घेतल्यानं असं होण्याची शक्यता कमी असते.
अनेक कंपन्यांच्या प्रोटीन पावडरमध्ये विषारी पदार्थ असतात. जे शरीरासाठी हानिकारक असतात आणि ते घेतल्यानं डोकेदुखी, थकवा, बद्धकोष्ठता आणि स्नायू दुखण्याची तक्रार होऊ शकते.