रक्त वाढवायचे असेल तर 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश!

Swapnil S

कोबी कोबी, फ्लावर, कांद्याची पात अशा भाज्यांचा आहारात समावेश करावा. कोबीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण अधिक असल्यानं शरीरातील हाडांना मजबूती देण्याचं काम करतं. कोबी हा कच्चा, सॅलडमध्ये किंवा कोशिंबीर करून खावा. | PM
डाळींब डाळींब हे रोज खाल्ल तरीही शरीरासाठी उत्तम आहे. थंड गुणधर्म असणाऱ्या डाळींबामुळे शरीरातील रक्त वाढण्यासोबतच हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होते. डाळींबामध्ये विटॅमिन ए, सी आणि ई असतं. डोकेदुखी, उदासिनता, आळस दूर करण्यासाठी डाळींबाचे रोज दाणे खाण्यावेत त्यामुळे प्रकृती सुधारण्यास मदत होते
PM
सोयाबिनमध्ये प्रथिन, लोह आणि फॅट असतं. त्यामुळे ताकद, वजन वाढवण्यासाठी भीजवलेलं सोयाबिन खावं. सोयाबिनची भाजी किंवा उकडलेलं सोयाबिनही खाल्ल तरीही फायदा होतो.
अंडी रोज सकाळी नाश्त्यामध्ये दोन उकडलेल्या अंड्यांचा समावेश करावा. अंड्यामध्ये एंटीऑक्सिडेंट, प्रोटीन आणि आयनचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे शरीरातील विटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी अंड्याची मदत होते. एका अंड्यामध्ये साधारण 1 एमजीपर्यंत आयनचं प्रमाण असतं.
बीट बीटापासून कोशिंबीर, कच्च किंवा उकडलेलं बीट अथवा बीट ज्यूस काहीही तुम्ही घेऊ शकता. बीट खाल्ल्यामुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं यासोबत रक्त वाढण्यासाठी मदत होते. शक्य असेल तर रोज सकाळी दूध, चहा घेण्याऐवजी बीटाचा ज्यूस घेतला तर उत्तम