Independence Day 2025 : बॉलिवूड सेलिब्रिटींनी अशा खास पद्धतीने केला उत्सव साजरा; पाहा फोटोज्
Mayuri Gawade
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने राष्ट्रीय ध्वजासोबत पोझ देत आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतानाचा फोटो शेअर केला.
अभिनेत्री कंगना रणौतनेही मुंबईत पापाराझींसमोर ध्वजासह पोझ दिली.
| Photo : Varinder Chawla
अभिनेत्री सोफी चौधरीने तिरंगी बांगड्या दाखवत लिहिलं की, “आपल्या भूतकाळाने आपल्याला स्वातंत्र्य दिलं, वर्तमान त्याला अर्थ देईल. एकतेसाठी, समानतेसाठी आणि विविधतेसाठी - स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.”
ऋषभ शेट्टीने केराडी सरकारी कन्नड माध्यमिक शाळेतील मुलांसोबत दिवस साजरा केला आणि ध्वजारोहण केले.
रुपाली गांगुलीने रस्त्यावरच्या कुत्र्यांसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, “या समुदायातील प्राण्यांनाही इथे जगण्याचा तितकाच अधिकार आहे जितका आपल्याला आहे.” हा संदेश तिने सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये हलवण्याच्या निर्णयानंतर दिला.