Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी मराठी अभिनेत्रींचा खास देशभक्तीमय लूक; पाहा Photos
किशोरी घायवट-उबाळे
"यतो धर्मः ततो राष्ट्रम्… वन्दे मातरम्!" अशी पोस्ट करत अभिनेत्री अक्षया हिंदळकरने तिरंगी अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
स्टार प्रवाह वरील 'सुना येती घरा' या मालिकेत कार्यरत असणाऱ्या दीपा परबने 'तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!' अशी पोस्ट करत व्हाईट ड्रेसवर तिरंगी ओढणी घेऊन फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री रूपाली भोसलेने ऑरेंज साडीतील मनमोहक फोटो शेअर करत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
व्हाईट कुर्ती आणि त्यावर तिरंगा बॅच लावून अभिनेत्री पूजा सावंतने 'सुजलाम, सुफलाम,
मलयज शीतलाम,सस्यश्यामलाम, वंदे मातरम्' असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
'घरोघरी मातीच्या चुली' या स्टार प्रवाह वरील मालिकेतील अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णीने व्हाईट कुर्तीमधील फोटो शेअर केले आहेत.
'स्वातंत्र्य दिन चिरायू होवो' असे म्हणत गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकरने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी अभिनेत्रींच्या या स्पेशल लुकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.