Independence Day Special : घराला द्या देशभक्तीचा स्टायलिश टच; 'या' ट्राय-कलर डेकोरेशन आयडिया नक्की पाहा

किशोरी घायवट-उबाळे

तिरंगा बलून डेकोरेशन - केशरी, पांढरे आणि हिरवे फुगे वापरून घराचा प्रवेशद्वार किंवा लिव्हिंग रूम सजवा.
पेपर फॅन आणि वॉल हँगिंग - ट्राय-कलर पेपर फॅन, पताका आणि अशोकचक्राच्या डिझाइनने भिंती सजवा. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
ट्राय-कलर रांगोळी - केशरी, पांढरा आणि हिरवा रंग वापरून घराच्या प्रवेशद्वारात आकर्षक रांगोळी काढा.
फ्लॅग डिस्प्ले - टेबल, शेल्फ किंवा खिडकीजवळ छोट्या तिरंगी ध्वजांची सुंदर मांडणी करा.
फुलांची सजावट - केशरी, पांढरी आणि हिरवी फुले एकत्र करून सुंदर फ्लॉवर अरेंजमेंट तयार करा.
ट्राय-कलर कुशन आणि डेकोर - सोफा किंवा बेडवर तिरंग्याच्या रंगातील कुशन कव्हर आणि सजावटीच्या वस्तू ठेवा.
ट्राय-कलर लाइटिंग - केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या एलईडी लाईट्स किंवा फेरी लाईट्सने घराला खास लुक द्या.
DIY डेकोरेशन - कागद, क्राफ्ट आणि रिसायकल वस्तूंपासून तिरंग्याच्या रंगातील हँडमेड डेकोर तयार करून घर सजवा.
डेकोरेशनसाठी केशरी, पांढरा आणि हिरवा या रंगांचा वापर काळजीपूर्वक करावा. सजावट करताना कुठेही राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची खात्री बाळगा.