पाणीपुरी, समोसा, पावभाजी कितव्या क्रमांकावर? डॉक्टरांनी दिली टॉप १० हेल्दी स्नॅक्सची यादी
Mayuri Gawade
आपल्या सर्वांनाच पाणीपुरी, समोसा, पाव भाजी असे स्नॅक्स आवडतात, पण हे स्नॅक्स खरंच किती हेल्दी आहेत हे माहीत आहे का?
| सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
कॅलिफोर्नियातील डॉक्टर डॉ. पाल मणिकम यांनी १० लोकप्रिय भारतीय स्नॅक्सची आरोग्याच्या दृष्टीने रँकिंग केली आहे.
त्यांच्या मते काही आवडते स्नॅक्स पोटासाठी धोकादायक, तर काही अतिशय फायदेशीर आहेत. रँकिंग पुढीलप्रमाणे आहे.
डॉ. पाल मणिकम यांच्या मते, सर्वात शेवटी म्हणजेच टॉप १० वर आहे पाणीपुरी. लोकप्रिय असली तरी ती डीप फ्राईड असल्याने शरीरामध्ये आम्लपित्त, गॅस आणि फुगवटा निर्माण करते.
तर टॉप ९ स्नॅक आहे भजी, जी चहासोबत आवडीने खाल्ली जातात, पण ती अत्यंत प्रोसेस्ड असल्याने त्यांच्यामुळे पचनसंस्थेतील चांगल्या जीवाणूंना हानी पोहोचवते.
टॉप ८ वर आहेत पकोडे, पावसाळ्यातील आवडता स्नॅक, पण तेलकटपणामुळे पचनावर ताण येतो आणि गट-बॅलन्स बिघडतो.
या यादीत टॉप ७ स्नॅक आहे समोसा, कारण त्यात वापरलेले रिफाइन्ड पीठ आणि डीप फ्रायमुळे पोट फुगते व गॅसचा त्रास वाढवतो.
टॉप ६ वर आहे पाव भाजी, जरी भाजी पोषक असली तरी त्यातील जास्त बटर आणि पावामधील रिफाइन्ड कार्ब्स आरोग्यासाठी अपायकारक ठरतात.
टॉप ५ स्नॅक म्हणजे मोमो. याबबदळ सांगताना डॉक्टरांनी फ्राईड मोमो टाळण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, स्टीम्ड मोमो मर्यादेत खाल्ले तर चालतात, पण त्यातील मसालेदार सॉस पोट बिघडवू शकतो.
टॉप ४ वर आहे मसाला खाखरा. होल व्हीटपासून बनवलेला आणि बेक केलेला असेल तर हा स्नॅक हलका आणि पचनासाठी योग्य ठरतो.
टॉप ३ स्नॅक आहे मक्याचे कणीस. लिंबू-मिरची लावून खाल्लं तर चवदार आणि पोटासाठी चांगलं, पण काहींना यामुळे थोडी पोटफुगी होऊ शकते.
या यादीत टॉप २ आहे मखाना, जो कमी फॅट, प्रोटीनयुक्त आणि पचनास हलका असल्याने डॉ. मणिकम यांचा आवडता स्नॅक आहे.
शेवटी टॉप १ स्नॅक आहे बॉइल्ड सुंदळ. दक्षिण भारतातील शिजवलेल्या हरभऱ्यांपासून तयार होणारा हा प्रोटीनसमृद्ध, तेलविरहित स्नॅक पचनास अतिशय हलका आहे.