कोणती पोस्ट आधी दिसणार हे आता तुम्ही ठरवणार; Instagram चं नवं फीचर समजून घ्या
Mayuri Gawade
इन्स्टाग्रामने 'Reorder Grid' हे नवे फीचर सादर केले असून, आता प्रोफाइलवरील पोस्ट्स हव्या त्या क्रमाने मांडता येणार आहेत.
आतापर्यंत पोस्ट्स कालानुक्रमानुसार दिसत होत्या, मात्र आता जुनी पोस्टही प्रोफाइलवर वर आणता येईल.
या फीचरमुळे वापरकर्त्यांना आपल्या प्रोफाइलचा लूक आणि मांडणी पूर्णपणे स्वतःच्या पसंतीनुसार बदलता येणार आहे.
'Reorder Grid' वापरण्यासाठी प्रोफाइलमधील कोणत्याही पोस्टवर टॅप करून धरायचे आणि 'Reorder Grid' पर्याय निवडायचा.
त्यानंतर पोस्ट्स ड्रॅग अँड ड्रॉप करून हव्या त्या ठिकाणी हलवता येतील.
पोस्ट्सचा क्रम बदलला तरी त्यांची मूळ पोस्ट तारीख, लाईक्स, कमेंट्स आणि इतर एंगेजमेंटवर कोणताही परिणाम होणार नाही.
हे फीचर कंटेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स, ब्रँड्स आणि व्यवसायांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे.
महत्त्वाच्या पोस्ट्स, पोर्टफोलिओ किंवा खास मोहिमांशी संबंधित कंटेंट प्रोफाइलवर ठळकपणे दाखवणे आता अधिक सोपे होणार आहे.
मेटाने नुकतीच भारतात 'Instagram Plus' ही सशुल्क सेवा सुरू केली असून त्यामध्ये अतिरिक्त कस्टमायझेशन फीचर्स दिली जात आहेत.
'Reorder Grid' मात्र सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार असून, प्रोफाइल अधिक आकर्षक आणि व्यवस्थित सादर करण्याची नवी संधी देणार आहे. | All Photos : Ai generated