थंडीत तुमची पण त्वचा कोरडी होत आहे?तर हे घरगुती उपाय करा

Swapnil S

हिवाळ्यात साबणामुळे त्वचा कोरडी होते.अशावेळी तुम्ही बेसनचा वापर करू शकता. याकरिता १ चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि दूध एकत्र करून चांगली जाडसर पेस्ट तयार करा.हा पॅक चेहऱ्याला लावा आणि कोरडे झाल्यावर चेहरा स्वच्छ करा. यामुळे त्वचा कोरडी होण्यापासून सुटका होण्यास मदत होईल. | PM
थंड दुधात ऑलिव्ह ऑइलचे थेंब टाका आणि चांगले चेहऱ्यावर कापसाच्या मदतीने मसाज करा आणि थोडा वेळाने पाण्याने धुवून टाका त्याने तुमची त्वचा मऊ होईल. | PM
कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी मध खूप फायदेशीर असते. एका भांड्यात एक चमचा मध घ्या आणि स्वच्छ चेहऱ्यावर चांगले लावा. सुमारे१० मिनिटे चेहऱ्यावर असू द्या त्यांनतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या | PM
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होत असेल तर आठवडातून दोन वेळेस केळाचा मास्क चेहऱ्यावर लावा. यासाठी केळे चांगले मॅश करून चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. थोडावेळ मास्क तसाच ठेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे कोरडी त्वचा कमी होईल. | PM
दह्यामध्ये अँटीऑक्सडंट्स आढळतात जे त्वचेला बरे करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड देखील असते. जे कोरडेपणा दूर करते. ते वापरण्यासाठी दही थेट चेहऱ्यावर लावा व मसाज करा आणि १० मिनिटानंतर पाण्याने धुवा. | PM
तुळशीच्या पानाचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी अनेक फायदे आहेत. तुळशीमध्ये त्वचेचे पोषण आणि मॉइश्चरायझेशन करणारे महत्त्वपूर्ण घटक असतात. मधामध्ये दाहविरोधी, हायड्रेटिंग असतात. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यास मदत होते. मिक्सरमध्ये तुळशीची पुरेशी पाने आणि थोडे पाणी घालून पेस्ट बनवा. निरोगी आणि मुलायम त्वचेसाठी या पेस्टमध्ये एक चमचा मध घाला आणि संपूर्ण शरीरावर लावा. १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. | PM