मुलींनो, साडी नेसल्यावर फोटोसाठी पोजच सुचत नाहीत? ईशा केसकरच्या 'या' अदा एकदा पाहाच

Mayuri Gawade

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकर आपल्या अभिनयाबरोबरच सुंदर लूकमुळेही चर्चेत असते. साडी नेसून फोटो काढताना कोणत्या पोज द्याव्यात, याच्या काही छान आयडिया तिच्या फोटोंमधून घेता येतील.
साडी नेसून फोटो काढताना नेहमी उभंच राहायला हवं असं नाही. ईशाप्रमाणे एका जागी निवांत बसून, हनुवटी हातावर टेकवून कॅमेऱ्याकडे पाहिल्यास सुंदर फोटो काढता येऊ शकतात.
साडीतील फोटो थोडे वेगळे हवे असतील, तर शरीर एका बाजूला वळवून मागे पाहण्याची पोज द्या. ईशानेही अशाच पद्धतीने उभं राहून फोटो काढला आहे. यामुळे केसांची रचना आणि साडीचा लूकही छान दिसतो.
फोटोमध्ये दागिने उठून दिसावेत असं वाटत असेल, तर ईशाप्रमाणे हलकेच हात चेहऱ्याजवळ ठेवा. अशा पोजमध्ये कानातले, बांगड्या आणि चेहऱ्यावरील हावभाव सुंदर टिपता येतात.
प्रत्येक फोटोमध्ये मोठ्याने हसण्याची गरज नसते. ईशाप्रमाणे हनुवटी हातावर टेकवून कॅमेऱ्याकडे पाहा आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू ठेवा. यामुळे साधी पोजही आकर्षक दिसू शकते.
साडीचा संपूर्ण लूक दाखवायचा असेल, तर थोडं अंतर ठेवून उभं राहून फोटो काढा. ईशाप्रमाणे नजर खाली ठेवून, हात समोर हलकेच धरल्यास साडीचा पदर, नक्षी आणि दागिनेही फोटोमध्ये दिसतील.
नेहमी कॅमेऱ्याकडे पाहूनच फोटो काढण्याऐवजी एकदा बाजूला पाहूनही फोटो काढा. ईशाप्रमाणे मान थोडी वळवून आणि एक हात केसांजवळ ठेवल्यास फोटोला वेगळाच उठाव मिळू शकतो.
साडी नेसून बसलेल्या अवस्थेतही सुंदर फोटो काढता येतात. ईशाप्रमाणे एका हाताचा आधार घेऊन थोडं पुढे झुका आणि दुसरा हात समोर ठेवा. अशा सोप्या पोजमुळे तुमचे फोटोही छान येऊ शकतात. | all photos : instagaram | Isha Keskar