पायांची खाज काही केल्या थांबत नाही? घरच्या घरी करा 'हे' उपाय, मिळेल झटपट आराम

किशोरी घायवट-उबाळे

पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवा - घाम किंवा ओलावा राहू देऊ नका. पाय धुऊन नीट कोरडे केल्याने बुरशी वाढत नाही. | (छायाचित्रे: Yandex)
कोमट पाण्यात पाय बुडवा - १०-१५ मिनिटे कोमट पाण्यात पाय ठेवल्याने खाज, जळजळ आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होते.
नारळाच्या तेलाची हलकी मसाज करा - नारळाचे तेल त्वचेला ओलावा देऊन खाज आणि कोरडेपणा कमी करण्यास मदत करू शकते.
अँटीफंगल क्रीमचा वापर करा - डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीफंगल क्रीम नियमित लावल्यास नायट्यावर प्रभावी नियंत्रण मिळते.
स्वच्छ सूती मोजे वापरा - दररोज स्वच्छ, कोरडे सूती मोजे घाला आणि ओले मोजे त्वरित बदला.
इतरांच्या चप्पल किंवा टॉवेलचा वापर टाळा - बुरशीजन्य संसर्ग पसरण्याचा धोका कमी करण्यासाठी वैयक्तिक वस्तू शेअर करू नका.
खाज आली तरी त्वचा खाजवू नका - सतत खाजवल्याने त्वचेवर जखम होऊन संसर्ग वाढू शकतो.
त्रास वाढल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या - खाज, वेदना किंवा लालसरपणा कायम राहिल्यास त्वरित डॉक्टरांकडून योग्य उपचार घ्या.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)