नऊवारी पैठणीत जान्हवी किल्लेकरचा दिलखेचक अंदाज! सौंदर्य पाहून चाहते झाले फिदा
Mayuri Gawade
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर तिच्या अभिनयासोबतच सुंदर फॅशन लूकमुळेही चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.
जान्हवीचा ग्लॅमरस अंदाजही चाहत्यांना आवडतो. काळ्या रंगाच्या चमकदार ड्रेसमधील तिचा हा सुंदर फोटो पाहा.
जान्हवीने नुकतेच गुलाबी रंगाच्या मुनिया नऊवारी पैठणीतील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा हा मराठमोळा अंदाज पाहण्यासारखा आहे.
गुलाबी पैठणीसोबत जान्हवीने सोन्याचे पारंपरिक दागिने, नथ आणि कपाळावर टिकली असा सुंदर साज केला आहे. हातात गुलाबी फूल घेऊन तिने खास पोज दिली आहे.
जान्हवीने पैठणीवर पफ स्लीव्हज आणि आकर्षक बॅकलेस डिझाईनचा ब्लाऊज परिधान केला आहे. या लूकमध्ये पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा सुंदर मिलाफ दिसतो.
केसांमध्ये मोगऱ्याचा लांबसडक गजरा आणि गुलाबी फुलांचा साज जान्हवीने केला आहे. तिच्या पैठणीवरील रंगीबेरंगी नक्षीही लक्ष वेधून घेते.
नथ, झुमके, सोन्याचे दागिने आणि हातावरील आलत्यामुळे जान्हवीचा पारंपरिक लूक आणखी खुलून दिसतो. तिच्या चेहऱ्यावरील हास्यही तितकंच सुंदर आहे.
गुलाबी पैठणी नेसून जान्हवीने जमिनीवर बसत सुंदर पोज दिल्या आहेत. तिच्या या नव्या फोटोशूटमधील प्रत्येक अदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.