आई श्रीदेवीची आठवण करून देणारा जान्हवी कपूरचा 'नागिन' अवतार! हॅलोविन पार्टीतील फोटो पाहून चाहते थक्क
Mayuri Gawade
अभिनेत्री जान्हवी कपूरने यंदाच्या हॅलोविन पार्टीनिमित्त आई श्रीदेवी यांना खास अंदाजात आदरांजली वाहिली.
जान्हवीने श्रीदेवी यांच्या १९८६ मधील 'नगीना' चित्रपटातील इच्छाधारी नागिणीचा लूक पुन्हा साकारला असून, तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
'नगीना' चित्रपटातील श्रीदेवी यांचा नागिणीचा लूक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. जान्हवीने मूळ चित्रपटाच्या पोस्टरची पुनर्निर्मिती करून आईच्या आठवणींना उजाळा दिला.
जान्हवीने तिच्या मित्रांसोबत 'नगीना' चित्रपटाचं पोस्टर पुन्हा तयार केलं. यात ओरीने ऋषी कपूर यांची, तर फोटोग्राफर वैष्णव प्रवीणने अमरीश पुरी यांच्या व्यक्तिरेखेची झलक साकारली.
जान्हवीने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा सुंदर पारंपरिक पोशाख परिधान केला. डिझायनर निधी हलानी यांनी खास तयार केलेल्या या पोशाखासह तिने श्रीदेवी यांच्या प्रसिद्ध नागिणीच्या हावभावांचीही झलक दाखवली.
जान्हवीने या खास फोटोशूटमध्ये पडद्यामागील क्षणही शेअर केले. तिचा हा लूक तयार करताना चित्रपटातील जुन्या काळाची झलक पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
श्रीदेवी यांच्या 'नगीना' चित्रपटातील नागिणीच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या भूमिकेतील त्यांचे डोळ्यांचे हावभाव आणि हातांच्या विशिष्ट हालचाली आजही प्रसिद्ध आहेत.
जान्हवीने या लूकसाठी पारंपरिक दागिने, मांगटिका, बिंदी आणि खास मेकअपची निवड केली. फोटोशूटपूर्वी तिचा मेकअप करतानाचे क्षणही तिने सोशल मीडियावर शेअर केले.
जान्हवीच्या या हॅलोविन लूकवर चाहत्यांसह बॉलिवूडमधील कलाकारांनीही प्रेमाचा वर्षाव केला. तिची बहीण खुशी कपूरने ‘तू हॅलोविन जिंकलीस’ अशी प्रतिक्रिया दिली, तर करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांनीही तिचं कौतुक केलं. | All Photos : Instagram : Janhvi Kapoor