Jitendra awhad : जितेंद्र आव्हाड आणि वाद हे नेहमीचेच ; मात्र आता राजीनामा

प्रतिनिधी

गर्दीच्या वेळेत सर्वसामान्य लोकलच्या फेऱ्याऐवजी वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवल्या जातात याविरुद्ध आव्हाड आक्रमक झाले होते 

ठाणे शहरात समूह पुनर्विकास योजना लागू करावी यासाठी राज्यात सत्तेत असतानाही आव्हाडांनी रस्त्यावर उतरून केले आंदोलन

नुकताच दोन दिवसांपूर्वी आव्हाड याना झालेल्या अटकेवरून आव्हाड यांचा इतिहास पाहता कोर्टानं जामिन देऊ नये, अशी मागणी अभिनेत्री केतकी चितळेने केली 

ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल, यामुळेच त्यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला 

दोन तीन दिवसांपूर्वी ठाण्यातील ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो थांबवल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. 

ओबीसींवर माझा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते', असं खळबळजनक वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दर्शकाला मारहाण केली होती. यानंतर मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला

विनयभंग? काय वाट्टेल ते आरोप? जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले आहे, पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा आहे, असे ट्विट दमानिया यांनी केले