जियाने बॅकलेस ड्रेसवर केले फोटोशूट; चाहत्यांनी फोटोंवर केल्या भन्नाट कमेंट्स म्हणाले...

Swapnil S

जिया शंकर ही एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. 'जी मेरी हानिकारक बीवी' मधील डॉ. इरावती "इरा" पांडे आणि 'काटेलाल अँड सन्स' मधील सुशीला रुहेल सोलंकी "सुशीला" या भूमिकेसाठी ओळखली जाते.
सोनी सब वर "गुड नाईट इंडिया" चे सह-सूत्रसंचालिका म्हणून देखीलतिने काम केले आहे. तिने अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्यासोबत 'वेड' या मराठी चित्रपटात दिसली होती.
जिया ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे.
त्या फोटोमध्ये जियाने निळ्या कलरचा बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 'Sardi ko aukat dikha di', 'हॉटनेस ओव्हरलोड', 'लेडी क्रश' अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.