कलाप्रेमींसाठी मेजवानी! मुंबईतील 'काळा घोडा कला महोत्सव' लवकरच होणार सुरु; जाणून घ्या माहिती

Swapnil S

मुंबईकरांसाठी, विशेषत: शहरातील कलाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. शहरातील अनेक लोक लोकप्रिय काळा घोडा आर्ट्स असोसिएशनद्वारे आयोजित काळा घोडा कला महोत्सवाची वाट पाहत आहेत आणि आता लवकरच त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. | PM
या महोत्सवामध्ये कॉमेडी, नृत्य, चित्रपट, खाद्य, साहित्य, संगीत, नाट्य, शहरी रचना, वास्तुकला आणि व्हिज्युअल आर्ट्स यासह असंख्य कलात्मक विषयांचे प्रदर्शन आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यंदाच्या महोत्सवातही नामवंत आणि नवीन कलाकार सहभागी होण्याची अपेक्षा आहे. | PM
लोकांमध्ये कला जागरुकता पसरवण्याच्या उद्देशाने दक्षिण मुंबईत काळा घोडा कला महोत्सावाची सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांत या फेस्टिव्हलची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, मुंबईसह इतर ठिकाणचे लोकही यासाठी येतात. | PM
काळा घोडा असोसिएशन या महोत्सवातील निधीचा वापर मुलजी जेठा फाउंटन, केई सिनेगॉग, होर्मर्जी क्लॉक टॉवरसह परिसरातील हेरिटेज इमारती आणि स्मारके पुनर्संचयित करण्यासाठी आणि जतन करण्यासाठी करते. | PM
काळा घोडा कला महोत्सव 20 ते 28 जानेवारी, 2024 या कालावधीत होणार आहे. हा उत्सव कला, हस्तकला आणि सर्जनशीलतेचा उत्साही उत्सव आहे, जो विविध कलात्मक अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक वारसा दर्शवतो. | PM