Black Raisins Benefits : काळे मनुके खाण्याचे जबरदस्त फायदे; संपूर्ण आरोग्यासाठी आहे लाभदायक

Mayuri Gawade

साधारणपणे लोक तपकिरी, लाल, हिरवे किंवा सोनेरी मनुके जास्त खातात, पण काळे मनुकेही आहारात समाविष्ट करणे तितकेच महत्त्वाचे आहे. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
अशक्तपणा, केस गळणे किंवा त्वचेच्या समस्या कमी करण्याबरोबरच त्यात अनेक पोषक तत्वे असून ते संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
पांढरे केस आणि केस गळणे कमी करण्यासाठी काळे मनुके उपयुक्त ठरतात. त्यातील जास्त प्रमाणातील लोह आणि व्हिटॅमिन सी शरीरातील खनिजांचे शोषण वाढवून केसांना योग्य पोषण देतात.
ॲनिमिया टाळण्यासाठी आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काळे मनुके फायदेशीर असतात. त्यातील भरपूर लोह आणि व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स लाल रक्तपेशींची निर्मिती वाढवून शरीरातील अशक्तपणा कमी करतात.
हाडं आणि दात मजबूत करण्यासाठी काळे मनुके उत्तम आहेत. त्यातील मुबलक कॅल्शियम हाडांचे आरोग्य टिकवून ठेवते आणि रोज ८ ते १० मनुके खाल्ल्याने हाडं व दात मजबूत राहतात.
काळे मनुके खाल्ल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदय निरोगी राहते. यामुळे हृदयविकाराचा धोका घटतो आणि एकूणच हृदयाचे आरोग्य सुधारते.
काळे मनुके खाल्ल्याने रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहतो. रोज सकाळी त्याचे सेवन केल्यास वाढलेल्या रक्तदाबामुळे होणाऱ्या समस्यांचा धोका कमी होतो.
काळे मनुके रक्त शुद्ध करून त्वचेला निरोगी आणि तजेलदार ठेवतात.