कारल्याचा रस पिणं आरोग्यासाठी ठरेल गुणकारी, जाणून घ्या फायदे!

Krantee V. Kale

कारल्याचा रस आरोग्यासाठी वरदान आहे. दररोज कारल्याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून सरंक्षण होते. | All Photos- Yandex
कारल्याचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे कोणते? जाणून घेऊयात.
कारल्याचा रस रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक नैसर्गिक उपाय मानला जातो.
कारल्याच्या रसाचे सेवन केल्याने लिव्हर डिटॉक्स होते आणि पचनसंस्था निरोगी राहते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबधित समस्येपासून आराम मिळतो.
कारल्याचे रस प्यायल्याने खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि रक्तदाब नियंत्रित होतो. यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. म्हणून, कारल्याचा रस प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते .
कारल्यामध्ये कॅलरीज कमी आणि पोषक तत्वे जास्त असतात. दररोज रस प्यायल्याने मेटाबॉलिजम रेट वाढतो आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
कारल्यामध्ये आयरन आणि फायबर असते. याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)