Karisma Kapoor Look : ब्लॅक अँड व्हाइट लूकमध्ये करिश्मा कपूरचा हटके अंदाज; इअररिंग्सने वेधलं लक्ष

किशोरी घायवट-उबाळे

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आपल्या अभिनयासोबतच स्टायलिश फॅशनसाठीही ओळखली जाते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले असून, तिचा हटके ब्लॅक अँड व्हाइट लूक लक्ष वेधून घेत आहे.
या फोटोंमध्ये करिश्माने काळ्या रंगाचे फुल स्लीव्हज जॅकेट परिधान केले आहे.
या जॅकेटला असलेल्या चायनीज कॉलर आणि समोरील बो-स्टाइल डिझाइनमुळे तिच्या लूकला वेगळाच अंदाज आला आहे.
या जॅकेटसोबत तिने ऑफ व्हाइट रंगाची फ्लोई आणि रफल डिटेलिंग असलेली स्कर्ट स्टाइल केली आहे.
स्लीक पोनीटेल, स्मोकी आय मेकअप आणि ब्राऊन लिपस्टिकमुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
हातात छोटी एम्बेलिश्ड क्लच आणि पायात ब्लॅक शूज असा लूक पूर्ण करत करिश्माने पुन्हा एकदा आपल्या हटके फॅशन सेन्सची झलक दाखवली आहे.
या मोनोक्रोम लूकला उठावदार बनवण्यासाठी करिश्माने सिल्व्हर ऑक्सिडाइज्ड स्टेटमेंट इअररिंग्सची निवड केली आहे.
करिश्माचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, तिच्या हटके लूकवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.