एलिगंट मेकअप आणि रॉयल गाऊन; करिश्मा कपूरचा स्टनिंग लूक व्हायरल

किशोरी घायवट-उबाळे

स्टायलिश गाऊन, चमकदार नक्षीकाम आणि एलिगंट मेकअपने करिश्मा कपूरने पुन्हा एकदा फॅशनप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. | (PHOTOS- INSTAGRAM/@therealkarismakapoor)
करिश्माने परिधान केलेल्या गाऊनमध्ये बारकाईने केलेले मण्यांचे नक्षीकाम आणि चमकदार एम्बेलिशमेंट्स पाहायला मिळाले. त्यामुळे तिचा संपूर्ण लूक अधिक आकर्षक दिसत होता.
या गाऊनची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे स्ट्रक्चर्ड शोल्डर्स (उठावदार खांद्यांची रचना). त्यावर करण्यात आलेल्या कॅस्केडिंग फ्रिंज डिटेलिंगमुळे (लटकत्या नक्षीकामामुळे) लूकला हटके आणि रॉयल टच मिळाला.
गाऊनच्या खोल गळ्याच्या डिझाइनमुळे करिश्माच्या लूकमध्ये मॉडर्न ग्लॅमरची झलक दिसली, मात्र त्याचवेळी तिचा एलिगंट अंदाजही कायम राहिला.
करिश्माने साइड-पार्टेड साधी आणि नीटनेटकी हेअरस्टाइलसह हलके कुरळे केस ठेवले होते. त्यामुळे गाऊनच्या खांद्यावरील डिटेलिंग अधिक उठून दिसत होती.
करिश्माने झुंबर स्टाइल कानातले परिधान केले होते. या दागिन्यांमुळे तिच्या लूकमध्ये चमक आली आणि गाऊनच्या नक्षीकामालाही परफेक्ट साथ मिळाली.
चमकदार त्वचा, हलका डोळ्यांचा मेकअप, उठावदार भुवया आणि फिकट रंगाची लिपस्टिक यामुळे करिश्माने ग्लॅमर आणि साधेपणाचा सुंदर मिलाफ साधला.
करिश्मा कपूरचा हा ग्लॅमरस आणि एलिगंट लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून चाहत्यांकडून तिच्या स्टाइलचे भरभरून कौतुक केले जात आहे.