'हवा महल'समोर कार्तिक-अनन्याची ग्लॅम केमिस्ट्री; पाहा फोटो

Mayuri Gawade

कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे सध्या त्यांच्या आगामी चित्रपट 'तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी'च्या प्रमोशनमध्ये जोरदार व्यस्त आहेत. | सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम (Kartik Aaryan)
२५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणाऱ्या या रोमँटिक ड्रामासाठी चाहत्यांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे.
समीर विद्वांस दिग्दर्शित हा चित्रपट रे आणि रूमीच्या प्रेमकहाणीवर आधारित असून, दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री हा चित्रपटाचा मोठा USP मानला जातो.
जयपूरच्या हवा महलसमोर कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेची तगडी ग्लॅम केमिस्ट्री पाहायला मिळाली.
कार्तिकने पिंक सिटीच्या थीमला साजेसा पांढरा टी-शर्ट, गुलाबी स्वेटशर्ट आणि डेनिम असा कूल लूक निवडला.
तर अनन्याने एलीगंट व्हाईट कॉर्ड सेटमध्ये ग्रेसफुल अंदाज दाखवत कार्तिकच्या लूकला परफेक्ट कॉम्प्लिमेंट दिली.
यानंतर हवा महलसमोर या जोडीने दिलेल्या पोजेसने खऱ्या अर्थाने ग्लॅम केमिस्ट्री दिसून आली. ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधले.
कार्तिकने शेअर केलेल्या फोटोवर “जयपूरने हवा देखील रोमँटिक कर दी!” असं लिहिलं आणि लगेच त्यांच्या केमिस्ट्रीवर कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला.