रानमेवा करवंद म्हणजे आरोग्याचा खजिना; जाणून घ्या फायदे
किशोरी घायवट-उबाळे
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते - करवंदामध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असल्याने इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
पचनासाठी फायदेशीर - करवंद खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास आणि ॲसिडिटी कमी होण्यास मदत मिळू शकते.
शरीराला थंडावा मिळतो - उन्हाळ्यात करवंद खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
रक्तासाठी उपयुक्त - आयर्न आणि पोषक घटकांमुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होऊ शकते.
वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत - कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहते.
त्वचेसाठी फायदेशीर - अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी आणि तजेलदार ठेवण्यास मदत मिळते.