मिस इंटरनॅशनल इंडिया २०२३ चा किताब, पण सिनेसृष्टी नाकारून भारतीय आर्मीत प्रवेश; कोण आहे 'ही' ब्युटी क्वीन?
नेहा जाधव - तांबे
पैसा आणि मनोरंजन या पलीकडे देशसेवा महत्त्वाची हे पुण्यातील कशिश मेथवानी या सुंदर तरुणीने आपल्या कामगिरितून सिद्ध केले. | (Photo - Insta/Ritikaramitri)
२०२३ मध्ये कशिश मेथवानीने मिस इंटरनॅशनल इंडिया हा प्रतिष्ठित किताब जिंकला. | (Photo - Insta/Ritikaramitri)
यानंतर या ब्युटी क्वीनला सिनेसृष्टीतून मोठमोठ्या संधी समोरून आल्या. | (Photo - Insta/Ritikaramitri)
पण, या ब्युटी क्वीनने हा मनोरंजन क्षेत्रातला मार्ग झुगारून देशसेवेचा खडतर मार्ग स्वीकारला. | (Photo - Insta/steppingstonessb)
तिने २०२४ मध्ये कंबाइंड डिफेंस सर्विसची परीक्षा दिली आणि ऑल इंडिया रँक २ मिळवला. त्यानंतर चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये कठोर प्रशिक्षण पूर्ण केलं.
भरतनाट्यम नृत्यांगना, तबला वादक, क्विझर, एनजीओ संस्थापक आणि खेळाडू अशा अनेक गुणांसह कशिशने बटालियन अंडर ऑफिसर ते अकादमी अंडर ऑफिसर पदापर्यंत प्रगती करत लेफ्टनंट म्हणून नेतृत्व सिद्ध केलं.
कशिशचे वडील शास्त्रज्ञ असून ते संरक्षण मंत्रालयाच्या गुणवत्ता हमी विभागातून महासंचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. | (Photo - Insta/victor.guzzle)
तर, आई पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका होत्या. आपल्या आई वडिलांकडूनच प्रेरणा घेऊन कशिशने आर्मी ऑफिसरचा प्रवास पूर्ण केला.
प्रशिक्षणादरम्यान कशिशने आर्मी एअर डिफेन्स मेडल, शीख लाईट इन्फंट्री मेडलसह अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त केले.
कशिश म्हणते "माझं प्रत्येक पाऊल देशासाठी आहे''. कशिश मेथवानीचा हा प्रवास भारतीयांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.
| (Photo - Insta/victor.guzzle)