कियाराने केला बॉसी लूक! अभिनेत्रीच्या लूकवर चाहते फिदा
Swapnil S
कियारा अडवाणी ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच ही अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्ससाठीही चर्चेत असते.
कियारा अडवाणीने नुकतेच ग्रे कलरच्या लाँग ब्लेझरमध्ये फोटोशूट केले.ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले.
अभिनेत्रीच्या फोटोंंमधील जबरदस्त, बिनधास्त असा बॉसी लूकवर अनेक चाहते फिदा झाले आहेत. चाहत्यांकडून या फोटोंवर अनेक कमेंट्स आणि लाईक्स मिळत आहेत, त्यामुळे तिचे हे फोटो खूप ट्रेंड करत आहेत.
अभिनेत्रीने ग्रे रंगाच्या ब्लेझरवर ग्रे रंगाचाच चोकर परिधान केला आहे, ज्वेलरीव्यतिरिक्त तिने मोत्याची अंगठी आणि पांढऱ्या- काळ्या मोत्यांचे ब्रेसलेट घातले आहे.
अभिनेत्रीने ग्रे रंगाच्या ब्लेझरवर ग्रे रंगाचाच चोकर परिधान केला आहे, ज्वेलरीव्यतिरिक्त तिने मोत्याची अंगठी आणि पांढऱ्या- काळ्या मोत्यांचे ब्रेसलेट घातले आहे.
अभिनेत्रीने न्यूड फेस मेकअप आणि स्मोकी आयसह तिचा स्टायलिश लूक पूर्ण केला आहे. कियाराने लिपस्टिक शेड ही लिप कलरची निवडली आहे. या ड्रेसमध्ये कियाराचा लूक जबरदस्त दिसतोय.