मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचंय? फोनची ही १ सेटिंग बदला; स्क्रीन टाइम होईल कमी
Mayuri Gawade
मुलांचा मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पालक वेगवेगळे उपाय करत असतात.
पण मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी त्याच्या स्क्रीनमधील रंगच कमी करता येऊ शकतात.
मोबाईलमधील रंगीत व्हिडिओ आणि गेम्स मुलांना जास्त आकर्षित करतात.
यासाठी मोबाईलमध्ये असलेलं ‘ग्रे स्केल’ मोड सुरू करता येतं.
हे मोड ऑन केल्यानंतर मोबाईलची संपूर्ण स्क्रीन काळी-पांढरी दिसू लागते.
त्यामुळे रंगीत गेम्स आणि व्हिडिओ आधीसारखे आकर्षक दिसत नाहीत.
अँड्रॉइडमध्ये ही सेटिंग सुरू करण्यासाठी Settings मधील Accessibility पर्यायात जा.
त्यानंतर Visibility Enhancement किंवा Color Adjustment मध्ये जाऊन Grayscale पर्याय निवडा.
या छोट्या बदलामुळे मुलांचं मोबाईलकडचं आकर्षण काही प्रमाणात कमी होऊन स्क्रीन टाइम कमी करण्यास मदत होऊ शकते. | All Photos : AI Generated