Kitchen Tips : फ्रिजमध्ये 'या' गोष्टी ठेवू नका; नाहीतर होईल नुकसान, वाचा महत्त्वाच्या टिप्स
किशोरी घायवट-उबाळे
फ्रिजमध्ये सगळं ठेवणं योग्य असतंच असं नाही. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यास ते लवकर खराब होऊ शकतात आणि त्यांची चवही बदलू शकते. | प्रातिनिधिक छायाचित्र
बटाटे (Potatoes) - फ्रिजमध्ये ठेवल्यास स्टार्च साखरेत बदलतो, त्यामुळे बटाटयाची चव बिघडते. त्यामुळे ते थंड आणि कोरड्या जागेत ठेवा. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
कांदा (Onion) - फ्रिजमधील थंड वातावरणामुळे कांदा मऊ होतो आणि त्यामुळे कांद्याचा वास पसरतो. म्हणून हवेशीर जागेत कांदा साठवा.
लसूण (Garlic) - फ्रिजमध्ये ठेवल्यास लसूण लवकर अंकुरतो. त्यामुळे कोरड्या आणि अंधाऱ्या ठिकाणी ठेवा.
टोमॅटो (Tomato) - फ्रिजमुळे टोमॅटोची नैसर्गिक चव आणि टेक्स्चर खराब होते. त्यामुळे ते बाहेर ठेवणे कधी चांगले.
ब्रेड (Bread) - फ्रिजमध्ये ब्रेड लवकर सुकतो. त्यामुळे ब्रेड रूम टेम्परेचरवर ठेवणे आवश्यक आहे.
केळी (Banana) - फ्रिजमध्ये ठेवल्यास साल काळी पडते आणि पिकण्याची प्रक्रिया थांबते.
मध (Honey) - फ्रिजमध्ये मध ठेवला तर तो घट्ट होतो. त्यामुळे मध सामान्य तापमानावरच ठेवा.
कॉफी (Coffee) - फ्रिजमधील ओलावा आणि वासामुळे कॉफीची चव खराब होते. त्यामुळे कॉफी एअरटाइट डब्यात ठेवा.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)