Kitchen Tips : पावसाळ्यात स्वयंपाकघरातील सामान खराब होण्याची चिंता? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

किशोरी घायवट-उबाळे

हवाबंद डब्यांचा वापर करा - मसाले, पीठ आणि रवा नेहमी एअरटाइट डब्यात ठेवल्यास ओलावा आत जात नाही. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
कोरड्या चमच्यानेच पदार्थ काढा - ओला किंवा दमट चमचा वापरल्यास पदार्थ लवकर ओलसर होऊन खराब होतात.
तमालपत्र किंवा तेजपत्ता ठेवा - डब्यात १-२ तमालपत्र ठेवल्याने कीड लागण्याची शक्यता कमी होते.
जास्त प्रमाणात साठवणूक टाळा - पावसाळ्यात गरजेपुरतेच पीठ, रवा आणि मसाले खरेदी केल्यास ताजेपणा टिकून राहतो.
थेट सूर्यप्रकाश नसलेल्या कोरड्या ठिकाणी ठेवा - गॅसजवळ किंवा सिंकजवळ न ठेवता कोरड्या कपाटात साठवणूक करा.
फ्रिजमध्ये ठेवण्याचा पर्याय वापरा - गरम मसाले, सुके मसाले किंवा रवा हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवल्यास ते जास्त काळ टिकतात.
डबे नियमित स्वच्छ करून कोरडे ठेवा - नवीन पदार्थ भरण्यापूर्वी डबे पूर्णपणे धुऊन आणि कोरडे करूनच वापरा.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)