आरोग्यासाठी सुपरफूड! किवी खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
किशोरी घायवट-उबाळे
रोगप्रतिकारशक्ती वाढते - किवीमध्ये भरपूर व्हिटॅमिन C असल्यामुळे इम्युनिटी मजबूत राहण्यास मदत होते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
पचन सुधारते - किवीतील फायबर आणि एन्झाइम्स अन्न पचवण्यास मदत करून बद्धकोष्ठतेची समस्या कमी करतात.
त्वचेला ग्लो मिळतो - अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी राहते आणि नैसर्गिक चमक वाढते.
हृदयासाठी फायदेशीर - किवी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
वजन कमी करण्यास मदत - कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते - किवीतील ल्युटीन आणि झेक्सँथिन डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात.
झोपेची गुणवत्ता सुधारते - किवीतील सेरोटोनिन शांत झोप लागण्यास मदत करू शकते.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)