Konkan Tourism : हॉलिडे प्लॅन करताय? मग कोकणातील ‘हे’ ७ समुद्रकिनारे मिस करू नका

Mayuri Gawade

कोकणाचं नाव घेतलं की शुभ्र वाळू, निळेशार समुद्र आणि शांत किनाऱ्यांचं सुंदर चित्र आपसूकच डोळ्यांसमोर उभं राहतं. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
महाराष्ट्रातील असे ७ समुद्रकिनारे आहेत, जे निसर्गसौंदर्य, शांतता आणि अनुभव यांच्या दृष्टीने परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन मानले जातात. चला, जाणून घेऊया या खास बीचबद्दल…
गणपतीपुळे बीच (रत्नागिरी) - शुभ्र वाळू, स्वच्छ, निळेशार समुद्र आणि किनाऱ्यावरच वसलेलं प्रसिद्ध श्री गणपती मंदिर- या सर्वांमुळे हा बीच कोकणातील सर्वाधिक हिट पर्यटनस्थळ ठरतो.
तारकर्ली बीच (सिंधुदुर्ग) - निळेशार समुद्र, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स… ॲडव्हेंचर आणि मजा अनुभवायची असेल तर महाराष्ट्रातील ‘नंबर वन’ ठिकाण म्हणजे तारकर्ली.
वेलास बीच (रत्नागिरी) - ऑलिव्ह रिडले कासवांचं सुरक्षित आश्रयस्थान. दरवर्षी होणारा टर्टल फेस्टिव्हल हा इथला मुख्य आकर्षण असून, निसर्गप्रेमींसाठी हा बीच अनुभव अविस्मरणीय करतो.
अंजर्ले बीच (दापोली) - गर्दीपासून दूर, लांब, स्वच्छ आणि शांत किनारा. फॅमिली ट्रिप, कपल्स ट्रीप किंवा फोटोग्राफी-सगळ्यांसाठी हा बीच परफेक्ट स्पॉट मानला जातो.
गुहागर बीच (रत्नागिरी) - मैलबभर पसरलेला, प्रदूषणमुक्त आणि अत्यंत स्वच्छ किनारा. गर्दीपासून दूर जाऊन रिलॅक्स व्हायचं असेल तर गुहागर हा उत्तम पर्याय.
निवती बीच (वेंगुर्ला) - हिरव्या झाडांनी वेढलेला शांत समुद्रकिनारा. जवळच असलेला निवती रॉक आणि निवती फोर्ट यामुळे इथल्या सौंदर्यात आणखी भर पडते.
मुरुड बीच (दापोली) - शांत वातावरण, मनमोहक सूर्यास्त आणि उपलब्ध वॉटर ॲक्टिव्हिटीजमुळे मुरुड हा दापोलीतील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा मानला जातो.