चेहऱ्यावर हवी काचेसारखी चमक? ट्राय करा हा कोरियन राईस मास्क

Mayuri Gawade

सध्या कोरियन स्किनकेअर ट्रेंड जगभर गाजत असून त्यातील राईस मास्कची सोशल मीडियावर विशेष चर्चा आहे.
तांदळातील नैसर्गिक गुणधर्म त्वचेला मऊ, स्वच्छ आणि तजेलदार दिसण्यास मदत करतात.
हा मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम पाण्यात तांदळाचे पीठ घालून घट्ट पेस्ट तयार करून घ्या.
पेस्ट थंड झाल्यानंतर त्यामध्ये ॲलोव्हेरा जेल मिसळा. त्यामुळे त्वचेला अतिरिक्त ओलावा मिळतो.
यानंतर गुलाबपाणी घाला. यामुळे त्वचा अधिक फ्रेश आणि हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
एक चमचा मध घालून सर्व मिश्रण एकजीव करा. मध त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करतो.
तयार मास्क संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि सुमारे १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या.
मास्क धुतल्यानंतर त्वचा अधिक ताजी, मऊ आणि स्वच्छ वाटू शकते.
आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास त्वचेवरील निस्तेजपणा आणि पिगमेंटेशन कमी होण्यास मदत मिळू शकते. | All Photo : Ai Generated