पंचायतमधील क्रांती देवीचा भन्नाट लूक पाहिलाय का?

नेहा जाधव - तांबे

पंचायत वेब सिरिजचा चौथा सीझन नुकताच प्रदर्शित झाला असून या सीझनची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यंदा सर्वात जास्त चर्चा क्रांती देवीची आहे. क्रांती देवीची भूमिका साकारली आहे ज्येष्ठ अभिनेत्री सुनीता राजवार यांनी. | (Photo - Sunita_rajwar Insta)
सुनीता यांनी पंचायतमधील क्रांती देवीची दमदार भूमिका निभावली आहे. घरच्या जबाबदारीसोबतच, क्रांती देवी राजकारणात मंजू देवीपेक्षा वरचढ दिसत आहे. | (Photo - Sunita_rajwar Insta)
त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD) येथून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी विविध हिंदी चित्रपट, सिरिज आणि नाटकमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या या अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर OTT अवॉर्ड देखील मिळालेला आहे. | (Photo - Sunita_rajwar Insta)
गावातील एका सामान्य स्त्रीच्या भूमिकेतील सुनीता राजवार या अस्सल आयुष्यात मात्र तरुणींना लाजवेल अशा वेशात असतात. | (Photo - Sunita_rajwar Insta)
त्यांचा पारंपरिक पण आधुनिकतेची छटा असलेला लूक पाहण्यासारखा आहे. त्यांच्या वेगवेगळ्या नोज रिंग्स आणि इअर रिंग्स ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण आभूषणे आहेत. | (Photo - Sunita_rajwar Insta)
सुनीता राजवार या खऱ्या आयुष्यात पाश्चिमात्य संस्कृतीसोबतच धार्मिक देखील आहेत. सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे त्यांचे हे रूप दिसून येते. | (Photo - Sunita_rajwar Insta)
सुनीता राजवार सांगतात की, ऑडिशन दरम्यान त्या मंजू देवीचे पात्र निभावू इच्छित होत्या, पण त्यांना क्रांती देवीची भूमिका देण्यात आली. त्या वेळी त्यांना थोडा अफसोस झाला होता, परंतु आज, लोक जेव्हा त्यांच्या पात्राची आणि अभिनयाची प्रशंसा करत आहेत, त्यामुळे त्या आता आनंदी आहेत. | (Photo - Sunita_rajwar Insta)