ललित-प्राजक्ताची 'रेशीमगाठ' पुन्हा जुळणार; नव्या फोटोंनी वेधलं लक्ष!
Mayuri Gawade
ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी ही लोकप्रिय जोडी तब्बल १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहे.
‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ललित-प्राजक्ताची जोडी आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
या दोघांची सहजसुंदर ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या आजही लक्षात असून, त्यांना पुन्हा एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे.
ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांचा आगामी चित्रपट ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ असून, या नव्या कथेत त्यांची जोडी पाहायला मिळणार आहे.
१३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणाऱ्या या जोडीने नव्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे.
‘शुभ मंगलम जोडी दंगलम’च्या घोषणेनंतर समोर आलेल्या फोटोंमुळे चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या चित्रपटात ललित आणि प्राजक्ता यांची नेमकी भूमिका काय असेल, याबाबतची उत्सुकता सध्या चाहत्यांमध्ये आहे.
नव्या चित्रपटात ललित-प्राजक्ताची प्रेमकहाणी कशी रंगणार आणि त्यांच्या ‘जोडी’समोर कोणती ‘दंगल’ उभी राहणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
ज्युबिलंट फिल्म्स स्टुडिओची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रतीक पाटील करत असून, पटकथा ललित प्रभाकर, प्रतीक पाटील आणि इरावती कर्णिक यांनी लिहिली आहे.
नितीन प्रकाश वैद्य आणि अश्विनी ब्रह्मनाथकर निर्मित ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’मधून ललित-प्राजक्ताची लोकप्रिय जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. | Photos : Instgram |Prajkta Mali