लाल साडी अन् मोत्यांचा चोकर; 'लपंडाव' फेम कृतिकाचा पारंपरिक लूक चर्चेत

किशोरी घायवट-उबाळे

‘लपंडाव’ फेम सखी म्हणजेच अभिनेत्री कृतिका देव हिने पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
कृतिकाने या लूकसाठी सुंदर लाल रंगाची साडी नेसली आहे.
लाल साडीवर तिने सोनेरी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
हातात हिरव्या आणि सोनेरी रंगाच्या बांगड्या तिच्या लूकला खास उठाव देत आहेत.
गळ्यातील सुंदर मोत्यांचा चोकर या पारंपरिक लूकचे आकर्षण ठरला आहे.
मिनिमल मेकअप आणि साध्या हेअरस्टाइलमुळे कृतिकाचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
लाल- सोनेरी रंगाच्या या कॉम्बिनेशनमध्ये अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज चाहत्यांना भावला आहे.
कृतिकाच्या या पारंपरिक लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.